नवी दिल्ली: शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. रविवारी इंडिया आघाडी रामलीला मैदानावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात निषेध प्रदर्शन करणार आहे. या निषेध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ठाकरे पिता – पुत्र दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज झाला आहे. दिल्लीतील निषेध प्रदर्शनासाठी खासदार शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.