मुंबई : आगामी लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत विद्यमान खासदार अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत यांच्यासह अन्य 17 जणांच्या नावांचा समावेश आहे. पहिल्या यादीत एकूण १७ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.”
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अनेकांचं लक्ष लागलं होतं. काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून तिढा निर्माण झाला होता. यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. त्यानंतर आज बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली.
शिवसेना ठाकरे गटाच्या 17 उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:
१) बुलढाणा -प्रा. नरेंद्र खेडेकर
२)यवतमाळ – वाशिम-संजय देशमुख
३)मावळ- संजोग वाघेरे पाटील
४)सांगली-चंद्रहार पाटील
५)हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
६)संभाजीनगर-चंद्रकांत खैरे
७)धारशीव-ओमराजे निंबाळकर
८)शिर्डी-भाऊसाहेब वाघचौरे
९)नाशिक-राजाभाऊ वाजे
१०)रायगड-अनंत गीते
११)सिंधुदुर्ग – रत्नागिरी-विनायक राऊत
१२)ठाणे-राजन विचारे
१३)मुंबई – ईशान्य-संजय दिना पाटील
१४)मुंबई – दक्षिण-अरविंद सावंत
१५)मुंबई – वायव्य-अमोल कीर्तिकर
१६)परभणी-संजय जाधव
१७) दक्षिण मध्य- अनिल देसाई