Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईने औषध माफियांमध्ये खळबळ! महाराष्ट्रात ११ कोटींची बेकायदेशीर औषधं जप्त, २०३ मेडिकलचे परवाने रद्द तर २१ जणांना अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 8 September 2026, 18:10

मुंबई: महाराष्ट्रात बेकायदेशीर औषध विक्री आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध उत्पादक कंपन्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई सुरू केली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली जून ते ऑगस्ट 2026 या तीन महिन्यांत राज्यभरात औषध उत्पादन आणि विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कालावधीत 607 उत्पादन आस्थापना आणि 2,295 विक्री आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, 880 परवानाधारकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यापैकी 203 आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

FDA च्या शोध आणि जप्ती मोहिमेदरम्यान औषध विक्रीतील गंभीर अनियमितता समोर आली. मागील तीन महिन्यांत अशा 104 कारवाया करण्यात आल्या. यामध्ये मुदतबाह्य औषधांची विक्री, संवेदनशील लसी योग्य तापमानात न ठेवणे तसेच औषधांच्या नोंदींमध्ये अनियमितता आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या कारवाईत औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचा तब्बल 11.41 कोटी रुपयांचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे.

गंभीर स्वरूपाच्या नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये 20 एफआयआर दाखल करण्यात आले असून 21 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे औषध विक्री आणि उत्पादन क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर FDA ने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

औषध आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादन करणाऱ्या काही कंपन्यांमध्येही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. मंजूर तांत्रिक कर्मचाऱ्यांऐवजी अनधिकृत कर्मचाऱ्यांकडून बॅच मॅन्युफॅक्चरिंग रेकॉर्ड (BMR) तयार केले जात असल्याचे आढळले. काही ठिकाणी योग्य तांत्रिक मनुष्यबळ नसतानाही क्वालिटी कंट्रोलच्या चाचण्या केल्या जात होत्या. प्रत्यक्ष उत्पादनाचे वजन आणि कागदोपत्री नोंदीतील वजनातही तफावत आढळली.

 

तसेच, परवान्यात मंजुरी नसलेल्या उत्पादनांचे आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचे उत्पादन केल्याची प्रकरणेही तपासणीत समोर आली आहेत. या कारवाईमुळे औषध उत्पादक आणि मेडिकल दुकानांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार औषधे मिळावीत यासाठी FDA कडून तपासणी आणि कारवाईची मोहीम पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09
Next Post

हडपसर ते उरुळी कांचनदरम्यान रोजचीच वाहतूक कोंडी? वाहतूक विभाग याकडे लक्ष देईल का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp