मुंबई : प्रत्येकाला आपल्या आयुष्यात प्रेम असावे असे वाटते. पण अनेकांचे नाते काही वर्षात तुटते. ब्रेकअप, हार्टब्रेक, एखाद्या आवडत्या व्यक्तीपासून वेगळे होणे अथवा घटस्फोट अशा गोष्टी होतात. यामध्ये प्रचंड दुःख, डोक्याला ताप आणि त्रास लपलेला असतो. गौर गोपाल दास यांनी याबाबत खूपच चांगले उदाहरण देत नात्यातून बाहेर येण्यासाठी नक्की काय करावे सांगितले आहे.
एखाद्या नात्यात तुम्ही एखाद्याला नाकारले अथवा समोरच्या व्यक्तीने तुम्हाला नाकारले तर त्यामुळे तुमचे मूल्य कधीच कमी होत नाही. सर्वात पहिली गोष्ट हार्टब्रेक, हार्टब्रेक झाल्यानंतर उगाच भांबावून न जाता ही गोष्ट स्वीकारा. कारण या भावनेतून बाहेर यायला वेळ लागतो. ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. एखादा भावनेच्या भरात चुकीचे पाऊल उचलू शकतो. त्यामुळे स्वतःला यातून सावरायला वेळ द्या.
मुलगा असो वा मुलगी त्रास होतोय तर रडून घ्या. तुमच्या मनात गोष्टी ठेवल्याने होणाऱ्या त्रासामुळे जितके वेळा रडायचं आहे ते रडून घ्या. सर्वांना त्रास होतो, त्यामुळे तो त्रास मनातून शरीरातून निघून जाणं आवश्यक आहे.
भावनिक त्रास कोणत्या गोष्टीमुळे होतो हे समजून घ्या आणि या जखमेतून बाहेर यायचं असेल तर तुम्ही सर्वात पहिले नक्की तुमचे कोणते ट्रिगर आहेत हे समजून त्यापासून दूर राहायला सुरूवात करा.
मनात जे साचलं आहे ते बोलायला जमत नसेल. तर तुम्ही वहीमध्ये ते लिहून काढा. अगदी समोरच्याबाबत तुम्हाला मनातून शिव्या येत असतील तर त्यादेखील तुम्ही लिहून काढा. ज्या साचलेल्या भावना आहेत, त्या लिहून बाहेर काढा. जेणेकरून तुम्हाला मोकळं वाटेल.