वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीने वाहनधारक मोठ्या प्रमाणावर हैराण झाले आहेत. महार्गावर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू असल्याने मागच्या एक महिन्यापासून वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. विरार खाणिवडे टोल नाका ते वसई हद्दीत वर्सोवा ब्रीज अशी २५ किलोमीटर ही वाहतूक कोंडी होत आहे. अतिशय धिम्या गतीने वाहतूक सुरु आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. या वाहतूक कोंडीचा परीक्षार्थी विधार्थी, पालघर जिल्ह्यातून मुंबईला रुग्ण घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिका यांना याचा मोठा फटका बसत आहे. तासंतास वाहन वाहतूक कोंडीत अडकत असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. आता या वाहतूक कोंडी कधी दिलासा मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.