Anant -Radhika Wedding : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. यावेळी देशभरातील नामवंत व्यक्ती, उद्योजक, सेलिब्रिटी या विवाहासाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबईतील बीकेसी परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
अंबानी कुटुंबातील शाही सोहळ्यानिमित्त मुंबई पोलिसांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. त्यानुसार बीकेसी परिसरातील वाहतुकीत 5 जुलै 2024 रोजी, म्हणजेच आज (शुक्रवारी) सायंकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत आणि 12 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 हे चार दिवस दुपारी 1 ते रात्री 12 वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. येथील वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात आली आहे. अर्थात, पोलिसांनी आपल्या पत्रकात अंबानी यांच्या घरच्या विवाह सोहळ्याचा उल्लेख केलेला नाही. त्यात केवळ सार्वजनिक कार्यक्रम असे नमूद करण्यात आले आहे.
असे आहेत मुंबईतील बीकेसी परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल…
बंद मार्ग
लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून धीरूभाई अंबानी स्क्वेअर अव्हेन्यू लेन 3 मार्गे इंडियन ऑइल पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन, हॉटेल ट्रायडंट तसेच, एमटीएनएल कुर्ल्याच्या दिशेने जाण्यास (कार्यक्रमास येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना बंदी राहणार आहे.
पर्यायी मार्ग
वन बीकेसीकडून येणारी वाहने लक्ष्मी टॉवर जंक्शन इथून डावीकडे वळून पुढे डायमंड गेट नंबर 8 समोरून नाबार्ड जंक्शन इथून उजवीकडे जाऊन पुढे डायमंड जंक्शन इथून पुन्हा उजवे वळण घेऊन धीरूभाई अंबानी स्क्वेअर / इंडियन ऑइल पेट्रोल पंप इथून पुढे बीकेसी परिसरात मार्गस्थ होणार आहेत.
बंद मार्ग
कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन व बिकेसी परिसरातील सर्व वाहनांना बिकेसी कनेक्टर ब्रिजव्या दिशेने जाण्याकरीता धिरुभाई अंबानी स्क्वेअर / इंडियन ऑईल पेट्रोलपंप येथून (कार्यक्रमाकरीता येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे.
पर्यायी मार्ग
कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटीना जंक्शन, डायमंड जंक्शन, नाबार्ड जंक्शन डावे वळण व डायमंड गेट नं. 8 समोरून लक्ष्मीटॉवर जंक्शन येथून उजवे वळण घेवून बिकेसी परिसरात मार्गस्थ होतील.
बंद मार्ग
भारत नगर, वन बीकेसी, दुई वर्क गोदरेज बिकेसीवरून (कार्यकमासाठी येणारी वाहने वगळून) सर्व वाहनांना जिओ कन्व्हेन्शन सेंटर गेट क्र. 23 इथून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, अमेरिकन दूतावास, एमटीएनएल जंक्शनच्या दिशेनं जाण्याकरीता प्रवेशबंदी राहणार आहे.
पर्यायी मार्ग
कौटिल्य भवन उजवे वळण-पुढे अॅव्हेन्यू १ रोडने इन्शुरन्स इन्स्टिट्यूट कार्यालय मागील बाजू-अमेरिकी दूतावासाच्या मागील बाजू धिरुभाई अंबानी स्कूल इथून इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.
बंद मार्ग
एमटीएनएल जंक्शन इथून (कार्यक्रमासाठी येणारी वाहनं वगळून) सर्व वाहनांना सिग्नेचर /सनटेक बिल्डींग इथून अमेरिकन दूतावास, जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर, बीकेसी कनेक्टर ब्रिजच्या दिशेनं जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.
धीरूभाई अंबानी स्कूल डावे वळण अॅव्हेन्यू १ रोडनं अमेरिकन दूतावासामागील बाजू-इन्शुरन्स इन्स्टिट्यूट कार्यालय मागील बाजू वी वर्क बिल्डींग उजवे वळण- गोदरेज बीकेसी डावे वळण घेवून इच्छित स्थळी मार्गस्थ होतील.
्असा असेल वन-वे मार्ग…
– लतीका रोड हा अंबानी स्क्वेअर ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी एक दिशा करण्यात येत आहे.
– अॅव्हेन्यू 3 रोड हा कौटील्य भवन ते अमेरीकन दूतावास जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी एक दिशा करण्यात येत आहे.