मुंबई : मुंबई विमानतळ (Mumbai Airport) देशातील महत्वाचे विमानतळापैकी एक आहे. येथून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होत असतं. मात्र, हे विमानतळ ९ मे (गुरुवारी)रोजी सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने अनेक कामे करण्यात येणार असल्याने ही विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशा वेळेत विमानतळ बंद राहणार आहे. या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाही.
या कामाची माहिती सर्व विमान कंपन्यांना सहा महिने अगोदरच देण्यात आली आहे. तसेच, 11 ते 5 या कालावधीमध्ये विमानसेवा तात्पुरती बंद राहणार असल्याने विमान कंपन्यानी त्या अनुषंगाने आपल्या विमानाचे नियोजन करावे, असे देखील या कंपन्याना सुचित करण्यात आले आहे.