मुंबई : सचिन वाझे आता पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझें यांनी केला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एवढच नाही तर वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य सुद्धा वाझेंनी केले आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. देवेंद्र फडवणवीसांवर अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी अतिशय गंभीर आरोप केले होते.
सचिन वाझे म्हणाले, सगळे पुरावे आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. मी सगळे पुरावे दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहले आहे त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव लिहले आहे. असे देखील वाझे म्हणाले.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Dismissed Mumbai police officer and accused in Rs 100 crore extortion case, Sachin Waze says, “Whatever has happened, the proof is there. The money used to go through his (Anil Deshmukh) PA, CBI has the proof and I have also written a letter to… pic.twitter.com/Y3MidoPDME
— ANI (@ANI) August 3, 2024