मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या आहेत. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या. मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांनी केली आहे. या घटनेने सगळ्यांचे धाबे दणाणून गेले आहे.