मुंबई: भारतीय जनता पक्षाकडून विविध राज्यातील प्रभारी आणि सहप्रभारी यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील तीन वरिष्ठ नेत्यांकडे विविध राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी मंत्री विनोद तावडे यांच्याकडे बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी कायम आहे. तर राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांच्याकडे मणिपूरची जबाबदारी देण्यात आली आहे, तर माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळ राज्याचे प्रभारीपद कायम ठेवण्यात आलं आहे.