Thane crime : ठाणे : ठाणे जिल्ह्यात तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. कासारवडवली येथे ही धक्कादायक घटना घडली. पतीने क्रिकेटची बॅट डोक्यात घालून आधी पत्नीला संपवलं. त्यानंतर दोन लहान मुलांचाही जीव घेतला. अमित धर्मवीर बागडी असे आरोपीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर मागील तन दिवसांपासून तो भाऊ विकास धर्मवीर बागडी याच्याकडे राहत होता. जयवंत निवृत्ती शिंगे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हत्यानंतर आरोपी अमित हा पळून गेला आहे, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
घरगुती कारणामुळे हत्या झाल्याचं प्रथमिक महितीमधून समोर आलेय. आरोपी अमित धर्मवीर बागडी हा मूळचा हरियाणातील खरडालीपुर येथील आहे. अमित बागडी याला दारुचं व्यसन होतं. तो कोणताही व्यावसाय करत नव्हता. त्यामुळे पत्नी भावना आणि अमित यांच्यात वारंवार भांडणं होतं होती. नवऱ्याच्या दारुच्या व्यसनामुळे ती त्याला सोडून विकास बागडी सोबत राहत होती. भावना असे मृत पत्नीचे नाव आहे. त्यानंतर सहा वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलालाही संपवलं.
गेले तीन दिवसापूर्वी अमित पत्नी आणि दोन मुले यांना भेटण्यासाठी म्हणून घरी आला होता. सकाळी अमितचा भाऊ विकास बागडी हा नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाउसकीपिंगच्या कामासाठी गेला. त्याच्यानंतर साधारण साडेअकराच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावना तसेच दोन मुले हे मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची बॅट दिसून आली.