मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला. राहुल नार्वेकर यांनी निकाल सुनावताना आज ठळक मुद्यांचे वाचन केले. निकाल सुनावताणा ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार पात्र ठरले आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात शिवसेना हा पक्ष कोणाचा, यावर निर्णय दिला. यामध्ये पक्षाची घटना, नेतृत्वाची रचना आणि विधिमंडळ पक्ष याचा विचार करण्यात आला. निवडणूक आयोगात असलेली 1999 ची शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरण्यात आली. शिवसेनेच्या घटनेतील बदल हे निवडणूक आयोगातील घटनेत आढळले नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. 2018 मध्ये पक्ष घटनेत झालेले बदल निवडणूक आयोगाकडे नसल्याचेही विधानसभा अध्यक्षांनी म्हटले.
विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात शिवसेना हा पक्ष कोणाचा, यावर निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 2018सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेची 1999 ची घटना वैध असल्याचा निर्वाळा दिला.
23 जानेवारी 2018 रोजी पक्षात निवडणुका झाल्या नाहीत. असे निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवले. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकारणीशी चर्चा करूनच पक्षातून काढण्याचा निर्णय घेता येऊ शकतो.
25 जून 2022 रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्याचा दावा. तसंच या बैठकीत सात निर्णय घेतल्याचा दावा प्रभू आपल्या ॲफिडेव्हीटमध्ये करतात. पण या बैठकीचे कोणतेही मिनिट्स प्रतिज्ञापत्रात जोडलेले नाहीत. शिवसेनेच्या लेटरहेडवर ते निर्णय घेतल्याचं लिहिलंय पण त्याशिवाय त्यावर कुणाच्याही सह्या नाहीत. भरत गोगावले यांचा व्हीप वैध असल्याचा निर्वाळा राहुल नार्वेकर यांनी दिला.