नवी मुंबई : अलिबागच्या निलंबित तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे उत्पन्नाच्या ९८ टक्के अधिक संपत्ती मिळून आली आहे. लाच मागितल्याप्रकरणी २०२२ मध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर त्यांच्या संपत्तीचा शोध सुरू होता. त्यामध्ये २ कोटी ६२ लाखांची त्यांची संपत्ती मिळून आली आहे. यातील बहुतांश संपत्ती त्यांच्या पतीच्या नावे केली असल्याचे समोर आले आहे. त्यांना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
तब्बल २ कोटी ६२ लाखांची संपत्ती समोर
मालमत्तेच्या अधिक मीनल दळवी यांची तब्बल २ कोटी ६२ लाखांची संपत्ती असल्याची चौकशीत समोर आले आहे. त्यामध्ये घरातून जप्त केलेल्या ऐवजासोबतच ५ घरे, १ भूखंड आणि १ व्यावसायिक गाळा अशी मालमत्ता उघडकीस आली आहे. ही सर्व संपत्ती त्यांचे पती कृष्णा दळवी (वय ५५) यांच्या नावे केलेली आहे.
दरम्यान, कृष्णा यांचा टुरिस्ट बुकिंगचा व्यवसाय होता, मात्र त्यातून कोणत्याही प्रकारे नफा नसताना दाखविण्यासाठी तो व्यवसाय चालवला जात होता. मात्र, संपूर्ण संपत्ती ही तहसीलदार मीनल दळवी यांनी शासकीय नोकरीला लागल्यापासून कमावल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवला आहे. त्यानुसार पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.