पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. मुंबई हायकोर्टाने निवडणूक घेण्याचा सूचना केल्या होत्या. मात्र, हायकोर्टाच्या या आदेशाला निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानुसार आता सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक घेण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे लोकसभा पोटनिवडणुक लवकरात लवकर घ्या, असा आदेश उच्च न्यायालयाने दिलं होता. या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच अवधी बाकी आहे, त्यामुळे पोटनिवडणुक होईल का? यावर प्रश्न चिन्ह आहे. याचिकाकर्त्यांना ४ आठवड्यांची मुदत देत पुढील सुनावणी ७ आठवड्यांनी ठेवली आहे. पोटनिवडणूकीबाबत कायद्याची स्पष्टता करू असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.