मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज गुरुवारी (दि.13) मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
#WATCH | Sunetra Pawar, NCP leader and wife of Maharashtra Deputy CM Ajit Pawar files her nomination for the Rajya Sabha by-elections. pic.twitter.com/vJmfjesKYp
— ANI (@ANI) June 13, 2024
सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार गटात कमालीची शांतता होती. मात्र, आज त्यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यसभा खासदारकीनंतर पवार यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लावण्याची चर्चा आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार गटाला आणखी बळ मिळणार आहे.
या जागेसाठी छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा होती. आज याबाबत बैठक घेऊन सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले, “मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि इतर मंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत विचाराअंती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे हा सर्वानुमते निर्णय झाला आहे.