मुंबई: मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आपल्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आजपर्यंत २७८ अनारक्षित गाड्यांसह ९८६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने यापूर्वी उन्हाळी विशेष गाड्यांच्या ८५४ सेवांची घोषणा केली होती आणि आता प्रवाशांच्या हितासाठी १३२ अतिरिक्त सेवा चालवणार आहे.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-खोरधा रोड साप्ताहिक विशेष गाड्यांच्या २६ सेवा धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नारंगी साप्ताहिक विशेष गाडीच्या ८ सेवा धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रीवा साप्ताहिक अतिजलद विशेष गाडीच्या २४ सेवा धावणार आहेत. कोल्हापूर-कटिहार साप्ताहिक विशेष गाडीच्या ८ सेवा धावणार आहेत.