मुंबई : शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार पाहिला मिळत आहे. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात वाढ दिसून आली. सेन्सेक्स 195 अंकांनी वाढून 72,500 वर पोहोचला. निफ्टीही 31 अंकांच्या वाढीसह 21,982 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी मेटल आणि बँकिंग शेअर्समध्ये झाली, तर आयटी आणि हेल्थकेअरमध्ये विक्री झाली.
काही शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. तर काही शेअर्समध्ये चांगली तेजी आली. शेअर बाजारात तेजी असलेल्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस, टाटा कंझ्युमर, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, ब्रिटानिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि पॉवर ग्रिड यांचा समावेश होता. तर अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, आयशर मोटर्स, एलटीआय माइंडट्री, Divi’s Lab आणि HUL या शेअर्समध्ये घसरण झाली.
गुरुवारी दाखल झालेल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये हिस्सा कमी केल्याची माहिती देण्यात आली आहे. सॉफ्टबँकने पेटीएममधील 2.17 टक्के हिस्सा कमी केला आहे. या बातमीनंतर पेटीएमचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले. सध्या पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे शेअर्स 4.38 टक्क्यांनी घसरून 388.40 रुपयांवर व्यवहार करत आहेत.