Cm Eknath Shinde : मुंबई मध्ये आज महापालिकेकडून स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी प्रत्येक विभागात व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम म्हणजेच डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबविण्याचे नियोजन केलं होत. आज त्या मोहिमेचा दुसरा टप्पा जुहू इथून सुरू झाला.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोहिमेत सहभाग घेतला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोहिमेचा आढावा घेत जुहू चौपाटीवर ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत ट्रॅक्टर वर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील बसले होते.
राजधानी मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य सरकारकडून यासंबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभागात व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. आज ९ डिसेंबरला या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाण्याचा पाईप हाती घेत या मोहिमेत सहभाग घेतला. तसेच मुख्यमंत्र्यांनी ट्रॅक्टर चालवण्याचाही आनंद लुटला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. नंतर जवळच असलेल्या इस्कॉन मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या.
#WATCH | At the cleanliness drive event on Juhu Beach, Maharashtra CM Eknath Shinde drives a tractor. pic.twitter.com/leDU2jJLGf
— ANI (@ANI) December 9, 2023