मुंबई : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, फौजिया खान, अरुण गुजराथी, खासदार अमोल कोल्हे, नीलेश लंके, धैर्यशील मोहिते-पाटील, भास्कर भगरे, बजरंग सोनावणे, बाळ्यामामा म्हात्रे, रोहित पवार, हरिभाऊ राठोड, नसीम सिद्दीकी, रोहित पाटील, पंडित कांबळे, राज राजपूरकर, उत्तम जानकर, हेमा पिंपळे, भूषणसिंह होळकर, हिरालाल राठोड, कविता म्हेत्रे, यशवंत गोसावी, जयदेव गायकवाड, शशिकांत शिंदे, सुनील भुसारा, प्रकाश गजभिये, बसवराज पाटील नागराळकर, रोहिणी खडसे, सक्षणा सलगर, सुनील गव्हाणे, विकास लवांडे, नितेश कराळे, जावेद हबीब, जयवंत वानोळे, संजय काळबांडे, श्रीराम मुंडे यांचा समावेश आहे.