मुंबई : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदी सुरुच ठेवा अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आलं असून केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परवानगी दिली आहे. राज्यातील सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचे निर्देश केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिले आहेत.
यापूर्वी ही खरेदी आजपर्यंत म्हणजे 13 जानेवारी पर्यंत करण्याचे निर्देश होते. आता सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री चौहान यांना फोन करत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी मान्य केली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे. मुदवाढ दिल्यामुळं हमीभावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंहे चौहान यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे फडणवीस यांनी स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली होती. ही मागणी तातडीने कृषीमंत्री चौहान यांनी मान्य करत 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. तसेच मी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांचा अतिशय मनापासून आभारी असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.