नवी मुंबई: सलग चार दिवस नवी मुंबईतील एपीएमसी बंद राहणार असल्याने मुंबईतील अनेक भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलकांनी वाशीतील एपीएमसीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुक्काम ठोकला असल्याने याचा मोठा परिणाम एपीएमसीच्या व्यवहारावर होणार आहे.
मराठा आंदोलनामुळे आधीच दोन दिवस एपीएमसी बंद आहे, त्यानंतर आता शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने सलग चार दिवस एपीएमसीतील व्यवहार ठप्प राहणार आहेत. सलग चार दिवस एपीएमसी बंद राहणार असल्याने भाजीपाला , फळ , कांदा बाटाचा या जीवनावश्यक गोष्टींचा मुंबई आणि परिसरात कमतरता भासवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जीवनावश्यक गोष्टींची कमतरता निर्माण होऊन भाजीपाला, कांदा, बटाटा , फळे यांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.