Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! लाईव्ह कॉन्सर्ट ठरला जीवघेणा, ड्रग्ज ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 April 2026, 11:15

Mumbai News : मुंबई : मुंबई येथील गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दोन कॉलेज विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कॉलेज वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे 6 वाजता नेस्को संकुलातील हॉल क्रमांक 4 मध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अंदाजे 3000 ते 4000 तरुण-तरुणी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अधिकृत आफ्टर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते आणि ती पहाटेपर्यंत सुरू असल्याची माहिती आहे.

या कार्यक्रमासाठी विविध प्रकारची तिकीट व्यवस्था करण्यात आली होती. जनरल एंट्री तिकीट सुमारे 1499 रुपयांपासून सुरू होते, तर व्हीआयपी तिकीट 2499 रुपयांपर्यंत होते. बॅकस्टेज पास सुमारे 5999 रुपयांना उपलब्ध होते. तसेच स्टेज टेबल आणि व्हीआयपी टेबलसाठी 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ठेवण्यात आले होते.

कॉन्सर्टदरम्यान काही तरुणांनी मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसने काही जणांची प्रकृती अचानक बिघडली. यामध्ये एका तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला असून दोघेही एमबीएचे विद्यार्थी असल्याचे समजते. आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रकृती खालावल्याने काही विद्यार्थ्यांना तातडीने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थ कसे पोहोचले याचा तपास सुरू आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29
Next Post

पुणे-सोलापूर प्रवास आता फक्त 45 मिनिटांत; महाराष्ट्र दिनापासून सुरु होणार 'हा' पर्यायी मार्ग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.