मुंबई: मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी या पूर्वीही सुरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.
सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे सचिव आहेत, तसेच ते आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. आदित्य ठाकरे यांची पडद्यामागची रणनीती सूरज चव्हाण ठरवायचे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, महापालिका निवडणूक आणि विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीचा त्यांचा बारीक आकडेवारीसह अभ्यास आहे.