Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाशी पंगा! नोटीस धुडकावत म्हणाले ‘जय भवानी’ शब्द हटवणार नाही

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 21 April 2024, 18:51

मुंबई : निवडणूक आयोगाने मशाल गीतामधून ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ हे दोन शब्द हटवण्यास सांगितलं आहे. पण, जय भवानी हा शब्द गीता मधून काढणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले असून निवडणूक आयोगाने बजावलेली नोटीस धुडकावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरु असल्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंनी यावेळी दाखवला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर कारवाई का नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे आणखी विचारणा केली होती, पण त्यावर उत्तर आलेलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आमच्या मशाल चिन्हाच्या गीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ असं एक कडवं आहे. त्यातील जय भवानी हा शब्द हटवण्याचा फतवा निवडणूक आयोगाकडून काढण्यात आला आहे. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत ‘जय भवानी’ हा शब्द हटवणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तसेच आमच्यावर कारवाई करणार असाल तर मोदी-शहा यांच्यावरही तुम्ही कारवाई करणार आहात का? हे आम्हाला सांगावं. मोदी-शहांमध्ये महाराष्ट्रातील देवांबाबत इतका द्वेष आहे हे आता कळत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडे तक्रार नाही, तर विचारणा केली होती. अटलजी पंतप्रधान असताना बाळासाहेबांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घेतला होता. ६ वर्ष त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. धर्माच्या नावावर भाजप निवडणुका लढवत आहेत. त्यांना सुट देण्यात आली आहे का? असं सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला.

पुढे बोलताना म्हणाले, आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, असं अमित शाह म्हणाले. बजरंग बलीचं नाव घेत पंतप्रधान मोदींनी प्रचार केला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर आधी कारवाई करा, असं उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून म्हटलं आहे. भवानी माता सर्व जनतेची माता आहे, तिचं स्मरण करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. आमच्या गीतातून धार्मिक प्रचार होत असेल, तर मोदी आणि शाहांच्या धार्मिक प्रचार करणाऱ्या वक्तव्यावर आधी कारवाई करा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात अनधिकृत होर्डिंगचे जाळे वाढले, पण महापालिकेची 7 क्षेत्रीय कार्यालये सुस्त! सात महिन्यांत कारवाई शून्य

Tuesday, 17 November 2026, 13:58

अजितदादांच्या विमान अपघातात रोहित पवारांचाच हात? भाजप नेत्याचा खळबळजनक सवाल; चौकशीची केली मागणी

Tuesday, 17 November 2026, 13:45

दौंड येथे कल्याण मटक्यावर पोलिसांची धडक कारवाई! एकाच दिवशी चार ठिकाणी छापे, 8 जणांवर गुन्हे दाखल

Tuesday, 17 November 2026, 13:44

आंतरजातीय विवाह केला म्हणून माहेरने तोडले नाते! मृत्यूनंतरही स्वीकारला नाही मृतदेह; नेमकं प्रकरण काय? वाचा

Tuesday, 17 November 2026, 13:11

Daund News : सोनवडीत आईच्या विनयभंगाचा राग मनात धरून तरुणाचा खून, धारदार शस्त्राने डोक्यावर वार, दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 13:08

CJP च्या राजकारणात ट्विस्ट! पक्षबांधणीनंतर ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा; नेमका काय आहे मास्टरप्लॅन?

Tuesday, 17 November 2026, 12:56
Next Post

सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही डीजेचा 'आव्वाज' वाढला; त्रास होत असेल तर थेट 112 नंबरवर करा तक्रार, पुणे शहर पोलिसांचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp