मुंबई : विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी सध्या सुरु आहे. अशात या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाकडून खोटी आणि बनावट कागदपत्रं सादर केल्याची तक्रार शिंदे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. यावेळी शिवसेना पक्ष कार्यालयातील कॉम्पुटर जप्त करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असून त्या दरम्यान शिंदे गटाने ही मागणी केली आहे. (Uddhav Thackeray)
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु असून 22 आणि 23 जूनच्या संदर्भात जे ईमेल लेटर दिल्याचं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूं यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयातील अनिल देसाई, सुनील प्रभू आणि विजय जोशी यांनी वापरलेले कॉम्पुटर, लॅपटॉप, टॅबलेट मोबाईल आणि इतर संपर्काची साधने जप्त करा म्हणत, तो ईमेल आयडी अस्तित्वातच नसल्याचा युक्तीवाद शिंदे गटाने करत शिवसेना ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्रं रेकॉर्डवर आणली जात असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. (MLA Disqualification Case)
विधानसभा अध्यक्षांसमोर या बनावट कागदपत्राप्रकरणी शिंदे गटाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्या ईमेल आयडीवर एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे, तो ईमेल आयडी ही अस्तित्वात नसल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमला यांनी केला आहे. या ईमेल आयडीवर ई-मेल करून बाउन्स बॅक झालेल्या मेलचा रिपोर्ट देखील या पत्रात जोडला आहे.(Eknath Shinde)
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर गेल्या तीन दिवसापासून सुनावणी सुरू असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांची पुन्हा साक्ष घेणं सुरू आहे. मागील आठवड्यातील सुनावणीमध्ये 21 जून 2022 रोजी ठाकरे गटाने बजावलेल्या व्हिपसंदर्भात तसंच 21 जूनला घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाने जो ठराव मांडला होता, त्यासंदर्भात अनेक प्रश्न, उपप्रश्न सुनील प्रभू यांना विचारण्यात आले होते. (Sunil Prabhu)