मुंबई : मुंबईतील हायप्रोफाईल मतदारसंघ ओळख असेलल्या दक्षिण मुंबईतील जागेवर भारतीय जनता पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारालाही सुरुवात देखील केली होती. मात्र, अखेर ही जागा शिवसेनेला सुटली असून त्यांनी आपला उमेदवार देखील जाहीर केला आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना मैदानात उतरवले जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ झालेल्या बैठकीत आमदार यामिनी जाधव यांच्या नावाला पसंती मिळाली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत विरूद्ध शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव असा सामना आता दक्षिण मुंबईत रंगणार आहे. यामिनी जाधव या शिवसेनेकडून भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. यामिनी यशवंत जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena pic.twitter.com/t3FL7mjvlB
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) April 30, 2024