मुंबई: शिवसेना पक्षातील आमदार अपात्रता सुनावणीचं नवं वेळापत्रक आता दसऱ्यानंतर तयार होणार असल्याची माहिती मिळतआहे. याबाबत महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांसोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर चर्चा करणार आहेत. तसेच नार्वेकर हे दसऱ्यानंतर दिल्लीलाही जाणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेसबंधित 30 ऑक्टोबरपर्यंत नवे वेळापत्रक सादर करावं, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. नार्वेकर हे दिल्ली दौऱ्यावर जाणार असून त्यावेळी नवे वेळापत्रक तयार करण्यासंदर्भात कायदा तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत.
आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीस जाणीवपूर्वक विलंब होत असल्याने सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना दोन वेळा अत्यंत कठोर शब्दांत फटकारलं आहे. या सुनावणीचे वेळापत्रक 30 ऑक्टोबरला सादर करण्याचे आदेश देत दोन महिन्यात निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
आम्ही दिलेल्या निकालानंतर 11 मे पासून अध्यक्षांनी केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय हा घ्यावाच लागेल, अशी टिप्पणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली होती. दैनंदिन काम करताय, तर त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल. जर तुम्ही निर्णय घेत नसाल, तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. याचिका निवडणूक आयोगासमोर नाही तर अध्याक्षांसमोर आहे. आतापर्यंत झलेले छोटे मोठे निर्णय सांगू नका, अध्यक्षांचे वेळापत्रक द्या. दसऱ्याच्या सुट्टीमध्ये अध्यक्षांसमोर बसून तुषार मेहता वेळापत्रक ठरवतील, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.