Maharashtra Politics : महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज सुनावण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज निकाल जाहीर करणार आहेत. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हा निकाल येणे अपेक्षित आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फुटीमुळे राजकीय वातावरण चांगलाच ढवळून निघालं होतं.
२० जून २०२२ रोजी शिवसेनेत मोठी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी बंड करत थेट गुवाहाटी गाठून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली होती.
सुप्रीम कोर्टात जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेची सुनावणी घेऊन निकाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल सुनावणार आहेत.
अपात्रतेची टांगती तलवार असणारे दोन्ही गटातील आमदार
शिवसेना शिंदे गट 16 आमदार
1) एकनाथ शिंदे
2) चिमणराव पाटील
3) अब्दुल सत्तार
4) तानाजी सावंत
5) यामिनी जाधव
6) संदीपान भुमरे
7) भरत गोगावले
8) संजय शिरसाठ
9) लता सोनवणे
10) प्रकाश सुर्वे
11) बालाजी किणीकर
12) बालाजी कल्याणकर
13) अनिल बाबर
14) संजय रायमूळकर
15) रमेश बोरनारे
16) महेश शिंदे
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार
1) अजय चौधरी
2) रवींद्र वायकर
3) राजन साळवी
4) वैभव नाईक
5) नितीन देशमुख
6) सुनिल राऊत
7) सुनिल प्रभू
8) भास्कर जाधव
9) रमेश कोरगावंकर
10) प्रकाश फातर्फेकर
11) कैलास पाटिल
12) संजय पोतनीस
13) उदयसिंह राजपूत
14) राहुल पाटील