मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाला असल्याची चर्चा सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 जानेवारीपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन्ही गटांच्या वकिलांना समोरा-समोर बोलावून हा निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नेमका कुणाला दिलासा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी काहीच दिवसांपूर्वी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष 10 जानेवारीपर्यंत वाट न पाहाता, आज किंवा उद्यापर्यंतच निकाल जाहीर करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तयार असून विधानसभा अध्यक्षांनी ही निकालाचा मसुदा दिल्लीला कायदेशीर अभिप्रायासाठी तज्ज्ञांकडे पाठवला असल्याचं वृत्त एका वृत्त वाहिनेने दिल आहे.
आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुरू असताना शिंदे गटाने शिवसेना एकच आहे, फक्त आम्ही शिवसेनेच्या नेतृत्वात बदल केल्याचा दावा केला होता. या मुद्द्यांचा आधारे शिंदे यांना दिलासा मिळू शकतो, अशीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या १० जानेवारीला नेमका काय निकाल येणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.