Deepfake Videos : बॉलिवूड अभिनेत्रींचे काही दिवसांपूर्वी काही डीपफेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर डीपफेक तंत्रज्ञानाबद्दल सर्वच स्तरातून भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलीलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
डीपफेक फोटो आणि व्हिडीओ प्रकरणी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी शर्मिला ठाकरे यांनी केली आहे. डीपफेक व्हिडीओ आणि सोशल मीडियावरून येणाऱ्या कमेंट्सवर बोलताना शर्मिला ठाकरे माहिती दिली आहे.
तसेच देशातील ब्रिटिशकालीन कायदे तकलादू असून हे कायदे बदलले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी मीडियाशी बोलताना केली. त्या पुढे म्हणाल्या, तुम्हाला विश्वास बसणार नाही या फेक व्हिडीओचा अनुभव मला आहे. माझ्या मुलीला पण युट्युबवर वाटेल तसे मेसेज टाकतात. अनेक वेळा या संदर्भात मी स्वत: कमिशनरांना तक्रार केली आहे. तक्रारीनंतर मुलांना अटकही केली जाते.
मात्र आपला कायदा तकलादू असून जो ब्रिटिशकालीन आहे. त्यामुळे अटक केल्यानंतर त्यांना सोडण्यात येते. त्यामुळे विधानसभेने कायद्यात बदल केला पाहिजे तरच त्यावर उपाय निघेल.