मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने शरद पवारांच्या वयावर टीका करत आहे. अजित पवारांच्या या टीकेनंतर उत्तर देताना एक मोठी निर्णय सांगितला. पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, माझी खासदारकीची मुदत अडीच वर्षांनंतर संपत आहे. त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही, हे मी आधीच ठरवलं आहे. माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे. त्यामुळं मी तोपर्यंत लोकांसाठी काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथं पाठवलंय तिथं मी काम करु नको का? माझ्या वयावर सातत्यानं बोललं जाते. मी 1967 पासून राजकारणात आहे . माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही. मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथं मी काम करत राहणार आहे.
दरम्यान राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा आहे, राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपली पाहिजे. देवेंद्र फडणवीस उद्याच्या निकालानंतर सरकार स्थिर राहील असं जर म्हणत असतील याचा अर्थ त्यांना निकालाबाबत माहिती आहे, असे शरद पवार म्हणाले.