मुंबई : विधानसभा निवडणुकीची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अजित पवार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या आधी घड्याळ चिन्ह गोठवावं. हे चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला मिळू नये, अशी विनंती शरद पवारांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांच्या पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देऊ नये. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हे चिन्ह त्यांना मिळू नये त्याऐवजी नवं चिन्हं द्यावं, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. अजित पवार यांच्या पक्षाने नव्या चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा आणि त्यांच्याकडून मिळालेल्या चिन्हावर निवडणूक लढावी अशी मागणी देखील या अर्जात करण्यात आल्याचे वृत्त Live Law ने दिलं आहे.
The founder of the Nationalist Congress Party(NCP), Sharad Pawar, has filed an application seeking to restrain the NCP(Ajit Pawar) from using the ‘clock’ symbol in the upcoming Maharashtra Assembly Elections. It urged the Supreme Court to direct the Ajit Pawar group to apply to… pic.twitter.com/3Zrz0LzqaM
— Live Law (@LiveLawIndia) October 2, 2024