Sharad Pawar Mumbai Rain Speech : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या साताऱ्याच्या भर पावसातल्या सभेनंतर आता मुंबईतही पवारांची भर पावसात सभा पार पडली. साताऱ्यातील शरद पवारांच्या सभेनंतर निवडणुकीचं चित्र पालटल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. अशातच पाऊस हा शरद पवारांसाठी लकी ठरतो की काय? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (Sharad Pawar Speech in Rain)
दरम्यान, नवी मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. शरद पवार येताच अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, समोर मोठा जनसमूदाय असल्याने पवारांनी हा कार्यक्रम रद्द न करता कायम करण्याची सूचना करून पवारांनी भर पावसातच पवारांनी भाषण सुरु केलं. 4 वर्षांपूर्वी अर्थातच 18 ऑक्टोबर 2019 ला साताऱ्यात शरद पवारांनी भर पावसात भाषण केलं होतं.
त्यानंतर आज पुन्हा शरद पवारांचं भर पावसात भाषण पहायला मिळालं आहे. आता असं झालाय पाऊस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं वेगळंच नातं आहे. पाऊस हा शरद पवारांसाठी लकी ठरणारा असल्याचं सांगत साताऱ्याप्रमाणे नवी मुंबईची जनताही आता शरद पवारांच्या पाठिशी राहणार असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. (Navi Mumbai)
साताऱ्यातील सभा शरद पवारांसाठी ठरली होती लकी
या आधी विधानसभा निवडणूक आणि सातारा पोटनिवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी साताऱ्यात जाहीर सभा घेतली होती. पवारांची सभा सुरु असताना धो-धो पाऊस कोसळत होता. पण पक्षाचे उमेदवार श्रीनिवास पाटील शरद पवारांच्या अगदी जवळचे मित्र आणि त्यांच्या राजकारणातील सुरूवातीपासूनचे सोबती यामुळे शरद पवारांनी त्यांच्यासाठी भर पावसात सभा घेतली घेऊन जनतेला संबोधित केलं होतं. यावेळी उदयनराजेंना पाडून श्रीनिवास पाटील खासदार झाले होते. यामुळे शरद पवारांची ती पावसातील सभा महाराष्ट्रातील जनतेच्या कायमच लक्षात राहिली. (Sharad Pawar Rain Sabha)