मुंबई: अजित पवार राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटातील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच अजित पवार गटाला निवडणूक आयोगाकडून पक्ष आणि चिन्ह देण्यात आल्यानंतर दोन्ही गटांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सातत्याने शरद पवार गटाकडून टार्गेट केले जाते, तर अजित पवार गटाकडूनही शरद पवार गटावर हल्लाबोल सुरु आहे.
आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तुलना थेट सरड्याशी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटर हँडलवर अजित पवार यांचा व्हिडिओ शेअर करून ही तुलना करण्यात आली आहे. अजित पवार हे 10 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना महायुती सरकार असा उल्लेख करताना ते अडखळल्याचे दिसून आले. यानंतर पवार यांच्या तोंडून महाविकास आघाडी उसा उल्लेख झाला.
तोच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अडखळलेला व्हिडिओ शेअर करून त्यांना थेट सरड्याची उपमा देण्यात आली. व्हिडिओ करून शेअर म्हटलं आहे की, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो. पण सारखा रंग बदलताना आपण आत्ता नक्की कुठे आहोत याचं भान मात्र त्याला राहत नाही. अजित पवारांच्या तोंडी महविकास आघाडीचं नाव येणं हा त्यातलाच प्रकार आहे. उपमुख्यमंत्री जरा सांभाळून, घार घिरट्या घालतेच आहे!!
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना पातळी ओलांडली होती. यानंतर विरोधी पक्षनेते आमदार जितेंद आव्हाड यांनी अजित पवार यांच्या घणाघाती प्रहार केला होता. यानंतर अजित पवार यांनी आपण जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला, अशी सारवासारव केली होती.
आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो पण सारखा रंग बदलताना आपण आत्ता नक्की कुठे आहोत ह्याचं भान मात्र त्याला राहत नाही. अजित पवारांच्या तोंडी महविकास आघाडीचं नाव येणं हा त्यातलाच प्रकार आहे. उपमुख्यमंत्री जरा सांभाळून, घार घिरट्या… pic.twitter.com/m0KUgLmQdJ
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 10, 2024