मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शरद पवार गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहील, असे सुप्रीम कोर्टाने सोमवारी सांगितले. न्यायमूर्ती सूर्या कांत आणि विश्वनाथन यांच्या खंडपीठाने शरद पवार यांना पक्ष चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे जाण्याची परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला एका आठवड्यात चिन्ह देण्यास सांगितले आहे.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे.
हा मतदारांचा विजय आहे, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण, नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय!, असा प्रश्न देखील उपस्थित केला. आम्हाला पूर्णपणे मान्यता देऊ नये, या मागणीवर जोरदार टीका करण्याव्यतिरिक्त, अशाच वादामुळे अंतिम मुद्यावरील संबंधित परिस्थितीचा उल्लेख केला आहे.
मध्यंतरी आम्हाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि माननीय ECI ला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर ७ दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीचा हा मोठा विजय आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानासाठी आम्ही लढत राहू, असं देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी, भारताच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे.
हा मतदारांचा विजय आहे, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 19, 2024