मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यातून वाचवलं, तर जलसिंचन घोटाळ्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचवत आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांना भाजपसोबत घेऊन संरक्षण दिले असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री शालिनी पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे शालिनीताई पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले आहेत.
“अजित पवार यांनी माझ्याकडे पैसा कुठून येतो याची चौकशी लावली. अँटी करप्शनचे अधिकारी याची चौकशी करत होते. त्यांना सांगायचे आहे, मला महिन्याला चार पेन्शन्स मिळतात. यातूनच मी कोर्टातील लढाई लढण्यासाठी खर्च करत असते. मागील पंधरा वर्षात तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मी माझा कारखाना सभासदांच्या हातात दिल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
“भारतीय जनता पक्ष म्हणजेच भारतीय हे नाव वापरायचा अधिकार कोणी दिला. महाराष्ट्रातील काही नेते माझं ऐकतात, त्यांना मी पत्र लिहून भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्याबाबत लढण्यासाठी विनंती केली. अजित पवार हे नाव पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या नकाशावरून गायब होईल. शरद पवारांच्या वयावरून बोलण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला. अजित पवारांना हे प्रश्न विचारण्याचा अधिकार काय आहे. शरद पवार ठरवतील त्यांना कधी रिटायर व्हायचा आहे. उद्या मला देखील मी 92 वर्षाची असल्याने वेडं ठरवतील,” असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.
पत्रात काय म्हटलं?
पाच वर्षांपूर्वी गून्हा दाखल होऊन देखील कारवाई होतं नाही. जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. तो घोटाळा देवेंद्र फडणवीस यांनी झाकून टाकला. तर, शिखर बँकेतील 25 हजार कोटींचा घोटाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना भाजपसोबत घेऊन झाकल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.