health news : मुंबई: बैठ्या कामामुळे अनेकांची पोटाची चरबी वाढते. हे लक्षात येताच त्यांनी वाईटही वाटते. मात्र, त्यावर उपायही आहेत. चलातर मग ते जाणून घेऊयात.
१. साखर बंद करणे
पहिलाच सल्ला म्हणजे साखर हा पूर्णतः बंद करा. साखर असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. त्याशिवाय, पोषक घटक कमी असतात. परिणामी शरीरात ऊर्जा खर्च करण्याचे आणि साठून राहण्याच्या प्रमाणात असमतोल निर्माण होतो. अतिरिक्त साखरेचे मेदामध्ये/चरबीमध्ये रूपांतर करते. या प्रक्रियेला लिपोजेनेसिस असे म्हणतात. यामुळे व्हिसेरल फॅट, जे आपल्या पोटाच्या आतील भागांवर, अवयवांवर जमा होऊ शकत अशीही तज्ञ देतात.
२. आहारात सॅलेडचा समावेश
पोटाची चरबी घटवण्यासाठी आपल्या आहारात दररोज सॅलेडचा समावेश करणे खूप उपयुक्त ठरू शकते. पालेभाज्या, विविध रंगांच्या भाज्या वापरून बनवलेल्या सॅलेडमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरयुक्त पदार्थांचे आहारात सेवन केल्याने कमी कॅलरीज असूनदेखील आपले पोट अधिक भरते आणि भूक भागण्यास मदत होते. सॅलेडमधील भाज्यांमुळे शरीर हायड्रेटेड राहते. पाण्यामुळे पोट लवकर भरण्यास मदत होते. सलाडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या पोषक घटकांचे भांडार असते. ज्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहून चयापचय क्रिया सुरळीत होते.
३. ४५ मिनिटे चालणे
दिवसभरातून केवळ ४५ मिनिटे चालण्याने तुमच्या पोटावरील चरबी कमी होण्यास अत्यंत फायदा होतो. मध्यम गतीने एरोबिक व्यायाम केल्यास शरीरामध्ये साठून राहिलेल्या अतिरिक्त चरबीचा ऊर्जा म्हणून वापर होतो. तर, व्यायामानंतर आपली चयापचय क्रिया सुधारून त्याचाही चरबी घटवण्यास उपयोग होतो. तसेच चालण्याच्या व्यायामामुळे आपला ताण कमी होतो.