मुंबई : राज्याच्या सहकार क्षेत्रातील शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून सायली एस. भोईर यांनी मंगळवार, १ एप्रिल रोजी पदभार स्वीकारला.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव म्हणून १४ वर्षे आणि तत्पूर्वी नागरी बँकिंग क्षेत्र २१ वर्षे अधिकारी पदावर यशस्वीपणे कार्य केलेल्या भोईर यांनी एलएलबी, सीए, आयआयबी आणि बँकिंग व अर्थ विषयात एमबीए केले आहे. फेडरेशनमध्ये कार्यरत असताना त्यांनी राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग तसेच सहकार आयुक्त व निबंधक यांच्या कार्यालयाने स्थापित केलेल्या विविध समित्यांवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. रिझर्व्ह बँकेच्या मुंबई विभाग व नागपूर विभागाची टॅफकब कमिटी तसेच बहुराष्ट्रीय नागरी सहकारी बँकांकरता असलेल्या केंद्रीय टॅफकब समितीवर देखील भोईर यांनी प्रतिनिधित्व केले आहे.