मुंबई : खिचडी घोटाळ्या प्रकरणी संजय राऊतांचे बंधू संदीप राऊतांना ईडीचे समन्स आले या विषयी बोलताना संजय राऊत यांनी म्हणाले की, संदीप राऊतांना दिलेल्या नोटिशीचं कारण अत्यंत हास्यास्पद आहे. त्याशिवाय, ममता बॅनर्जी यांच्या इंडिया आघाडीपासून वेगळे होण्यावरही त्यांनी भाष्य केले आहे.
हास्यास्पद आणि मूर्खपणाचा प्रकार
‘संदीप राऊत यांचे हॉटेल आहे. खिचडीसाठी त्यांचे हॉटेल वापरण्यात आले. माझ्या मुलीने त्यांना मदत केली, याविषयीची नोटीस पाठवली आहे. हा प्रकार हास्यास्पद आणि मूर्खपणाचा आहे. आमची घरातील लोक जातील आणि उभे राहतील ठामपणे काय हवं ते करा’, असे प्रतिक्रीया देताना संजय राउत म्हणाले.
आमच्या रक्तात शिवसेना
‘तुमची बायका पोरं परदेशात लंडनमध्ये राहत आहेत, स्वतःचे व्हिला घेऊन कुठून आले सांगू का पण आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही. संस्कार बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांचे आहेत. यांची लढाई आमच्याशी आहे आमच्याशी लढा.. आमच्या लोकांना बेकादेशीरपणे बोलवत आहेत. पिंजऱ्यात उभे करू काय हवं ते करा. हे घर डरपोक लोकांचं नाही. आमच्या रक्तात शिवसेना आहे. काल रोहित पवार यांचे भाषण देखील ऐकला असेल हा महाराष्ट्र स्वाभिमानी मराठी माणसांचा आहे. डरपोक लोकांचा नाही जे डरपोक लोक होती ते XX होते ते तुमच्या कळपात शिरले’, असे संजय राऊत म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव
‘आप आणि ममता बॅनर्जींनी जरी स्वबळावर आपापल्या राज्यात लढण्याची भूमिका घेतली असेल तरी पश्चिम बंगालमध्ये त्या पूर्णपणे भाजपचा पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये आहेत. जागा वाटपाचा तिढा हा पहिल्यापासून आहे. आज आमची काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली आणि त्यासंदर्भात ममता जी यांच्याशी बोलतील. पंजाबमध्ये आप काय झालं तरी भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल’, असे संजय राऊत म्हणाले.