मुंबई : पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये येऊन काळाराम मंदिरात गेले. पूजा केली, भव्य रॅली काढली, पण भगूरच्या सावरकरांच्या स्मारकावर त्यांना जावे वाटले नाही, असे म्हणत राऊतांनी मोदींवर निशाणा साधला. त्याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही असेही ते म्हणाले.
ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये सुरु होणार आहे, अशी माहिती देत उद्धव ठाकरे तिथे जातील, असे असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवासस्थानी जाऊन अभिवादन करतील. आमच्यासाठी तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे. नाशिकमध्ये येऊन सावरकरांना अभिवादन केलं नाही असे होऊ शकत नाही.
22 तारखेला काळाराम मंदिरात दर्शन पूजा आणि रामकुंडावर पूजा असा कार्यक्रम असेल. प्रत्यक्षात 23 तारखेला अधिवेशन असेल. साधारण 5.30 वाजता उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील. पावणेसात वाजता उद्धव ठाकरे गोदातीरावर जातील आणि आरती होईल. याआधी अनेकदा आम्ही शरयू तीरावर आरती केलीय पण यावेळी नाशिकमध्ये करू. अयोध्येनंतर रामायणात पंचवटीला महत्व आहे. म्हणून आम्ही नाशिक निवडलं आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात म्हणजेच गोल्फ मैदानात विराट अधिवेशन सभा पार पडेल. जनता न्यायालय हा महाराष्ट्रातला आणि देशातला यशस्वी कार्यक्रम झाला. 23 तारखेला सकाळी नाशिकच्या डेमोक्रसी क्लबमध्ये शिवसेनेची राज्यव्यापी शिबीर पार पडेल. प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन होईल आणि काही ठराव मांडले जातील. जनता न्यायालयात या देशातली न्यायव्यवस्था, केंद्रीय यंत्रणा यांना उघडे पाडले आहे.