मुंबई: काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले संजय निरुपम लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. निरुपम यांनीही आपण शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मी आता जोरात काम, जोरदार प्रचार करणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे पुन्हा एकदा माझ्या घरात आल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया निरुपम यांनी दिली.