मुंबई : संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय काही गिवसांपूरर्वी घेतला होता. त्यावरून अनेक राजकीय पर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. आता संभाजीराजेंनी सगळ्या तर्क वितर्कांना विराम देत आपण कोल्हापूरमधूनच निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी संभाजीराजेंना सामावून घेण्याची तयारी दर्शवली होती. पण यासाठी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करण्याची अट घातली होती.संभाजीराजेंनी गुरुवारी सायंकाळी स्वत:च्या स्वराज्य पक्षामधूनच निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची पोस्ट शेअर करत चर्चांना पूर्णविराम दिला.
याआधी ते नाशिकमधून निवडणूक लढणार की कोल्हापुरातून याबाबत संभ्रम होता. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विशेष म्हणजे संभाजीराजे उद्यापासून मतदारसंघाचा दौरा सुरू करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे #स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे. #LokSabha2024
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 1, 2024
इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही
गुरुवारी संभाजीराजेंनी पोस्ट शेअर करत “स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे. स्वत:च्या स्वराज्य पक्षामधूनच निवडणूक लढण्यावर ठाम,” असल्याचं स्पष्ट केलं.