मुंबई: बॉलिवूड विश्वातली आजची सर्वांत मोठी खळबळजनक घटना म्हणजे अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याची. मात्र त्याच्या घरामध्ये चोरीच्या हेतूने घुसलेल्या चोराने सैफ अली खान जेंव्हा त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होता तेंव्हा चाकुहल्यात तो जखमी झाला आहे. चोराने त्याच्यावर धारधार चाकूने हल्ला करून त्याला जखमी केलं आहे. जखमी झालेल्या सैफअला खानला लगेचच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर चोरीच्या हेतूने सैफच्या वाद्रे येथील घरात घुसले होते. पोलिसांना एका आरोपीची ओळख पटली आहे. आता पोलिस इतर आरोपी शोधत आहेत. एक आरोपी फरार असून, त्याचाही शोध पोलिसांकडून केला जात आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांकडून अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी, डीसीपी दीक्षित म्हणाले त्यांना गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास सैफवर चाकूने हल्ला झाला आहे अशी बातमी मिळाली होती. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैफ अली खान वर झालेल्या हल्याचा घटना क्रम
घटना क्रम सांगताना म्हणाले गुरुवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास हल्लेखोर सैफअली खानच्या घरात घुसला तेंव्हा कामावल्या बाईने त्याला पहिले.तिच्यासोबत त्याचा वाद झाला. तेंव्हा सैफअली खान तिथे आला आणि त्याने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मोलकरणीचा आवाज ऐकून तैमूर आणि जेह देखील उठले. मग त्यांनी सैफला बोलावले. सैफ तिथे आला तेंव्हा त्याने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोराने सैफवर धारदार चाकूने सहा वेळा वार केले. यामुळे सैफच्या हातावर, मानेवर, आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. हे हल्लेखोर फायर एस्केपमधून चोरीच्या उद्देशाने घरात घुसले होते.
सैफअली खान वर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील काही जणांची ओळख पोलिसांना पटली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.