मुंबई: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरे बाबतची मागणी करत होते, ती लवकरच पूर्ण होणार आहे. राज्य सरकार लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकात पाटील म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकार सतत आवाहन करत आहे की, सगेसोयऱ्याची जी अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याचा जो मसुदा तयार केला आहे, त्यावर आठ लाखांहून अधिक हरकती आल्या आहेत. त्या हरकती सोडवल्यानंतरच ती अधिसूचना आम्ही काढणार आहोत, असं पाटील यांनी म्हटले आहे.