मुंबई : नागपूर हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात औरंगजेबाची कबर हा मुद्दा हिंदूत्ववादी संघटनांकडून केंद्रस्थानी आणला जात असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा मुद्दा सध्या संयुक्तिक नसल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनिल आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनिल आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संघाची भूमिका मांडली. ते म्हणाले, समाजिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी कुठलाही हिंसाचार हा चांगला नाही. राष्ट्रीय स्वयंसवेक संघ कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन करत नाही. नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. औरंगजेबाचा मुद्दा या घडीला संयुक्तिक नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सुनिल आबेडकर यांनी मांडली आहे.