मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील टी 20 क्रिकेटचा सामना मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स संघात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर रविवारी (ता.7) झाला. हा सामना मुंबईने 29 धावांनी जिंकला.
या सामन्यात रोहितने 27 चेंडूत 49 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये 1500 व्यांदा चौकार मारण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा तो पहिलाच भारतीय ठरला.
टी 20 क्रिकेटमध्ये आजपर्यंत सर्वाधिक चौकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर ख्रिस गेल आहे. त्याने 2196 चौकार मारल्या आहेत. त्यानंतर ऍलेक्स हेल्स 1855, डेव्हिड वॉर्नर 1673, कायरन पोलार्ड 1670, ऍरॉन फिंच 1557, रोहित शर्मा 1503 चौकार मारणाऱ्या फलंदाजांची नावे आहेत.
दरम्यान, रोहितने या खेळीदरम्यान दिल्लीविरुद्ध 1000 धावाही पूर्ण केल्या. त्याने यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धही 1000 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये दोन संघांविरुद्ध 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम केवळ डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहलीला करता आला आहे.