Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

OBC निधीवरून सरकारमध्येच खदखद! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 2 September 2026, 9:41

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापले असतानाच आता OBC समाजाच्या योजनांसाठी निधीवरून सरकारमधीलच मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. OBC कल्याणासाठी मंजूर झालेला निधी वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत छगन भुजबळ, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या OBC उपसमितीच्या बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी विविध विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. OBC महामंडळाच्या योजनांना निधी मिळण्यात विलंब होत असल्याने अनेक उपक्रम रखडले आहेत, अशी नाराजी मंत्र्यांनी व्यक्त केली.

मंत्र्यांनी बैठकीतून बाहेर पडल्यानंतर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना निधीच्या विलंबाबाबत जाब विचारला. अर्थसंकल्पात OBC विभागासाठी मंजूर असलेली रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंजूर निधी देणे आवश्यक असतानाही प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मंत्री संजय राठोड यांनी सांगितले की, वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी सुरुवातीला 300 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. नंतर ही रक्कम 50 कोटींवर आली, मात्र तो निधीही अद्याप मिळालेला नाही. केवळ बैठका घेऊन उपयोग नसून निर्णयांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, महाज्योतीसह विविध महामंडळांना प्रत्येकी 300 कोटी रुपये देण्यात आले आहेत. महाज्योतीने मात्र 1000 कोटींची मागणी केली आहे. प्रलंबित 125 कोटी रुपयांची बिले तातडीने अर्थ विभागाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाज्योतीच्या PhD फेलोशिपसाठी असलेला 126 कोटी रुपयांचा निधी डिसेंबरपर्यंत देण्याचे सांगण्यात आले. तसेच OBC विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीची संख्या 75 वरून 200 करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतील उत्पन्न मर्यादा 1 लाखांवरून 8 लाख रुपये करण्याचा प्रस्तावही चर्चेत आला. OBC विद्यार्थ्यांच्या योजना आणि महामंडळांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

Wednesday, 2 September 2026, 10:37

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17

OBC निधीवरून सरकारमध्येच खदखद! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग

Wednesday, 2 September 2026, 9:41
Next Post
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp