मुंबई : मुंबईत रिक्षातून प्रवास करणं आता महागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर भार पडणार आहे. रिक्षामेन्स युनियनने उपनगरात चालणाऱ्या ऑटोरिक्षांच्या मूळ भाड्यात 2 रुपये भाडेवाढ करण्यासाठी सरकारकडे विनंती केली आहे. यामुळे लवकरच रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
सध्याचं मूळ भाडं 23 रुपये असून युनियनकडून आता 25 रुपये करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच तीन रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात अली आहे. याआधी मुंबईमध्ये 22 ऑक्टोबर 2022 पासून रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरात वाढ झाली होती. दरम्यान, रिक्षाचे किमान भाडे 23 तर टॅक्सीचे भाडे 28 रुपये झाले होते. (Auto Rickshaw)
दरम्यान, यासंदर्भात 30 नोव्हेंबर रोजी राज्य परिवहन सचिव आणि राज्य परिवहन विभागाच्या इतर अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्रात, युनियनचे नेते थॅम्पी कुरियन यांनी सांगितले की, त्यांची ही नवीन भाडेवाढ करण्याची विनंती वाढत्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे, जी सरकारच्या सूत्रानुसार भाडे समायोजन निर्धारित करण्यात एक महत्त्वपूर्ण घटक आहे. कुरियन यांनी मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे पाच लाख ऑटो चालकांचे हित लक्षात घेऊन प्रस्तावित दरवाढीचे समर्थन केले. याबाबत फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिले आहे. (Thampy Kurien)
ते पुढे म्हणाले की, वाहनांचा भांडवली खर्च, देखभाल आणि दुरुस्ती खर्च, विमा आणि कर यासह अनेक घटक वाढले आहेत, ज्यामुळे नवीन भाडेवाढ सुरु करणे अपरिहार्य आहे. 30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या पत्रात या बाबी नमूद केल्या आहेत.
2022 मध्ये ऑटो 2 तर, टॅक्सींसाठी 3 रुपये भाडे वाढ
याबाबत एका वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून शहरात कोणत्याही भाडेवाढीच्या प्रस्तावाचे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी द्वारे मूल्यांकन केले जाते. ऑक्टोबर 2022 मध्ये, MMRTA ने ऑटोसाठी 2 रुपये आणि टॅक्सींसाठी 3 रुपये भाडे वाढ करण्यास मान्यता दिली होती.(Mumbai Auto Rickshaw)