मुंबई : राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी भाजपला एक मोठा धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढचं नाही तर आज रात्री ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.