मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही कारवाई केली.
मुख्यमंत्रीपद संवैधानिक पद असून, एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते आहेत. त्यांच्याविरुद्ध अपशब्द काढून त्यांचा अवमान करण्याचा केलेला प्रयत्न अक्षम्य अपराध आहे. या अवमानकारक वक्तव्याबाबत कटके आणि त्यांचा पुत्र संतोष यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.